कोरोना अपडेट | सोलापूरात आज 483 जणांना कोरोनाची लागण; 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 7,157 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 32 हजारांच्या पार गेला आहे

सोलापूर । सोलापूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आज जिल्ह्यात 483 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 32 हजार 295 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 7 हजार 157 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1126 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 24 हजार 12 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वाढती रुग्णसंख्या हा आता सोलापूरकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.



AM News Developed by Kalavati Technologies