Corona Solapur : सोलापूरात पुन्हा 49 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 5239 वर

जिल्ह्यात सध्या 1417 जणांवर उपचार सुरू असुन, 3453 जणांनी कोरोनावर मात केली आहे

सोलापूर । सोलापूरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासात पुन्हा 49 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकूण कोरोनाबधितांची संख्या ही आता 5 हजार 239 गेली आहे. तर गेल्या 24 तासात 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा हा 369 वर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात 1417 जणांवर उपचार सुरू असून, 3453 जणांनी कोरोनावर मात केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies