औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला; आज दुपारी 25 रुग्णांची वाढ, सहा जणांचा मृत्यू

औरंगाबादेत आज दुपारी 25 रुग्णांची वाढ झाली आहे.

औरंगाबाद | जिल्ह्यातील 25 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 12 हजार 151 इतकी झाली आहे. त्यापैकी 6690 बरे झाले असून 423 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सद्यस्थितीला 5 हजार 038 जणांवर उपचार सुरु आहेत. नव्याने पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांचा तपशिल पुढीलप्रमाणे..

*मनपा हद्दीतील रुग्ण (20)*

पोलिस कॉलनी, मिल कॉर्नर (2), टीव्ही सेंटर (1), कासलीवाल गार्डन, मुकुंदवाडी (1), मामा चौक (1), अशोक नगर, मयूर पार्क (1), एन बारा हडको (3), हर्सुल टी पॉइंट (1), एसआरपीएफ परिसर (10)

*ग्रामीण भागातील रुग्ण (5)*

गंगापूर (1), पिशोर रोड, कन्नड (2), फुलंब्री (1), सिल्लोड (1)

*सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू*

घाटीत राम नगरातील 32 वर्षीय पुरूष, सिडको मुकुंदवाडीतील 55 वर्षीय पुरूष, विविध खासगी रुग्णालयांत सेव्हन हिल परिसरातील 56 वर्षीय पुरूष, पैठण गेट येथील 55 वर्षीय स्त्री, मित्र नगरातील 62 वर्षीय स्त्री, मिसरवाडीतील 40 वर्षीय स्त्री कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.AM News Developed by Kalavati Technologies