धक्कादायक! कोरोनाला घाबरून स्मशानभूमीत गळफास लावून केली आत्महत्या

रिपोर्ट येण्याआधीच कोरोनाला घाबरून संपवले जीवन, कल्याण जवळील मलंगगड पट्ट्यातील काकडवाल गावातील घटना

कल्याण । कोरोना विषाणूच्या भीतीमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. या कोरोनाच्या भीतीपोटी मलंगगड पट्ट्यात मत्स्य विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने
काकडवाल गावातील स्मशानभूमीत गळफास लावून आत्महत्या केली. कोरोना विषाणूमुळे ते घाबरून गेले होते आणि त्यांनी रात्रीच्या अंधारात आपले जीवन संपवले आहे.
कोरोनाने आता ग्रामीण भागात देखील शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये गैरसमज हे अधिकच वाढत चालले आहे. कल्याण जवळील मलंगगड येथील काकडवाल गावातील एक व्यक्ती गेल्या 2 दिवसांपासून आजारी होता आणि त्या व्यक्तीने स्वतः होमक्वारंटाईन करून सुद्धा घेतले होते. तसेच कोरोनाची चाचणी देखील केली होती. मात्र त्याचा रिपोर्ट येण्याआधी त्या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यामुळे कल्याण जवळील मलंगगड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही नागरिकांनी अशा कठोर निर्णयाची पाऊले उचलू नयेत असे आवाहन सरपंच चैनू जाधव यांनी केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies