Satara Corona : साताऱ्यात पुन्हा 263 जणांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या पोहोचली 5 हजार 641 वर

सध्या जिल्ह्यात 2,855 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत 2,615 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे

सातारा । सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आज जिल्ह्यात तब्बल 263 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याचा आकडा 5 हजार 641 वर पोहोचला आहे. दरम्यान आज 122 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून, आतापर्यंत 2,615 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या जिल्ह्यात 2,855 जणांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे 171 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies