धक्कादायक...! रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यानं कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा घरातच मृत्यू

बेड उपलब्ध नसल्यानं या रुग्णाला घरातच क्वॉरंटाइन करा असा सल्ला महापालिकेनं दिला असल्याचा आरोप मृत रुग्णाचा कुटुंबियांनी केला आहे.

मुंबई | पवईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा बेड अभावी घरातच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. पवईतील चैतन्यनगर परिसरातील मातृछाया सोसायटीत राहणाऱ्या एका 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्याबाबत सदरील व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी महापालिका प्रशासनास ही माहिती दिली होती. मात्र बेड उपलब्ध नसल्यानं या रुग्णाला घरातच क्वॉरंटाइन करा असा सल्ला महापालिकेनं दिला असल्याचा आरोप मृत रुग्णाचा कुटुंबियांनी केला आहे. पॉझिटिव्ह असूनही रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्यानं या रुग्णानं घरातच आपला जीव सोडला असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं आहे. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे आम्ही आमच्या कुटुंबातील व्यक्तीला गमावून बसलो असं मृत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींनी म्हंटल आहे.AM News Developed by Kalavati Technologies