भारतात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढला; 24 तासांत 3 हजार 334 रुग्ण बरे

देशात आतापर्यंत एक लाख 18 हजार 446 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे

नवी दिल्ली | चीनच्या वुहान शहरात पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण भारतात हाहाकार केला आहे. भारतात कोरोना विषाणूचे रुग्ण आणि मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत आहे. या प्राणघातक विषाणूमुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. मात्र केद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात कोरोनापासून बरे होणाऱ्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 41 टक्के इतका झाला आहे. म्हणजेच 100 रुग्णांमधून 41 रुग्ण या आजारातून बरे होत आहेत. ही आपल्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. आतापर्यंत भारतात जवळपास 1 लाख 18 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 48 हजार 534 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर 3 हजार 583 रुग्णांचा या आजारानं बळी घेतला आहे.

कोणत्या राज्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात कोरोना विषाणूची 80 टक्के प्रकरणे महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांत नोंदवली गेली आहेत तर 10 राज्यात 90 टक्के प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहे.

कोणत्या राज्यात मृत्यूचे प्रमाण जास्त

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 80 टक्के मृत्यू पाच राज्यांत म्हणजेच महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, बंगाल आणि दिल्लीमध्ये झाले आहेत. यामधील 60 टक्के मृत्यू फक्त पाच शहरांमध्ये झाले आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद आणि ठाणे येथे झाले आहेत. तसेच, मृत्यूंपैकी 70 टक्के मृत्यू केवळ 10 शहरांमध्ये म्हणजेच मुंबई, अहमदाबाद, पुणे, दिल्ली, कोलकाता, इंदूर, ठाणे, जयपूर, चेन्नई आणि सूरत येथे झाले आहे.

भारतात कोरोनामुळं मृत्यूचे प्रमाण किती? 

देशातील कोरोनाबाधित मृतांची संख्या केवळ 3.02 टक्के आहे. 19 मे रोजी कोरोनाचा मृत्यू दर 3.13 टक्के होता, आता तो 0.32 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्याचबरोबर देशात आतापर्यंत एक लाख 18 हजार 446 पेक्षा जास्त लोकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून त्यापैकी 3 हजार 583 लोकांचा मृत्यू झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies