राजभवनावर कोरोनाचा कहर, 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

राज्यपालांची प्रकृती चांगली असुन, खबरदारी म्हणुन राज्यपाल विलगीकरणात

मुंबई । राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण संख्या ही एकट्या मुंबई सापडल्याने मुंबईच्या चिंतेत वाढ होत चालली आहे. कोरोना आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निवासस्थानात म्हणजेच राजभवनावर पोहोचला आहे. राजभवनावरील 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. राजभवनावरील 100 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणात आली होती त्यामधुन 55 जणाचे रिपोर्ट हाती आले आहे. त्यामधुन 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याने राजभवनात खळबळ उडाली आहे. यात सर्वात अगोदर एक वायरमन कोरोना पॉझिटिव्ह आला असुन, आणखी 45 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रकृती चांगली असुन, त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. परंतु खबरदारी म्हणुन राज्यपाल विलगीकरणात झाले आहे.

दरम्यान मुंबईत कोरोनाची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली असुन आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.AM News Developed by Kalavati Technologies