Corona In Nanded : नांदेडमध्ये आज 203 कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 2359 वर

जिल्ह्यात सध्या 1232 रुग्णांवर उपचार सुरू, तर 1020 जणांनी केली कोरोनावर मात

नांदेड । नांदेडमध्ये आज कोरोना रुग्णांच्या संख्येने पहिल्यांदाच द्विशतकी आकडा पार केला आहे. जिल्ह्यात आज द्विशतकी रुग्णसंख्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. मागील 24 तासांमध्ये तब्बल 203 रुग्ण आढळले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. परंतू त्यानंतरही बाधित रुग्णसंख्येचा आकडा वाढतच आहे. सध्या  जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2359 वर पोहचली आहे.  

आज जिल्ह्यात 66 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 84 इतकी झाली आहे. आज प्राप्त झालेल्या 1106 तपासणी अहवालांपैकी 854 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर 203 जणांचे अहवाल अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 2359 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1020 जणांनी कोरोनावर मात केली असुन, सध्या जिल्ह्यात 1232 जणांवर उपचार सुरू आहेत. दररोज वाढत असलेल्या शहरी रुग्णसंख्या बरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या वेगाने होत असल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाची चिंता वाढतच आहे.AM News Developed by Kalavati Technologies