बरं वाटत नसेल तर घरबसल्या घ्या डॉक्टरांची मदत! 'हे' अॅप करेल मदत

तुम्ही घर बसल्या डॉक्टरांशी सल्ला मसलत करू शकता

मुंबई | महाराष्ट्रामध्ये राजधानी मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबई शहरात या साथीचा वेगाने फैलाव होत आहे. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यात देखील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे नागरिक हैराण झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र घाबरून न जाता ताप, सर्दी, खोकला येत असेल तर तुम्ही घर बसल्या डॉक्टरांशी सल्ला मसलत करू शकता महाराष्ट्र सरकारने त्यासाठी एक अॅप तयार केले आहे. esanieevaniopd.in या संकेतस्थळावरून अधिक माहिती मिळवू शकता. त्याचा वापर करुन आपण घाबरून न जाता आपली काळजी घेऊ शकता. याठिकाणी आपण सकाळी 8:30 ते 12:30 या वेळेत तब्येतीची विचारपूस करू शकता.AM News Developed by Kalavati Technologies