राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनाची बाधा झाली असून, त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

मुंबई । राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांना सुद्धा कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. नुकतेचं राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करत याबाबत माहिती दिली. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. त्यांनतर तपासणी केली असता, त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

त्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात लिहले आहे की,'नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्नं झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे कोरोना चाचणी करुन घ्यावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या' असे ट्वीट गायकवाड यांनी केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies