राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 335 वर, तर देशात 1725 रुग्ण बाधित

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 335 वर मुंबईत 14 नवीन रुग्ण तर बुलडाण्यात 1 रुग्ण

मुंबई | राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 335 वर पोहचला आहे. आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसा मुंबईत 14 नवीन रुग्ण तर बुलडाण्यात 1 रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचा संख्या 320 वरून 335 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत राज्यात या आजाराने 12 जणांचा बळी घेतला आहे.

कोरोनाशी लढा देता यावा म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर राज्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दर तासाला वाढ होतांना दिसून येत आहे. ही मोठी चिंतेची बाबत आहे. राज्यासह देशात सुद्धा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1725 वर गेला असून आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies