राहुरी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव...

एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण

राहुरी । राहूरी तालुक्यात चार कोरोनाग्रस्त सापडल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केसापुर मधील एकाच कुटुंबातील तीन तर बांबोरीत एक असे चार रूग्ण आता तालुक्यात आढळून आले आहे. केसापुर येथील मुंबई-ठाणे येथे लग्नासाठी गेलेल्या एकाच कुटुंबायातील तिघांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर यातील एकाला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. वांबोरी येथील रहिवासी असलेले परंतु मुंबई-पनवेल येथुन जिल्हा रूग्णालयात दाखल झालेला एक असे चार रूग्ण तालुक्यात सापडल्याने आता अधिक खबरदारी घेणे गरचेच झाले आहे. याआधी राहुरी तालुका हा कोरोनामुक्त झाला होता, परंतु आता चार रूग्ण आढळून आल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहाण्याचे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies