Corona In India : देशात गेल्या 24 तासात 44,281 जणांना कोरोनाची लागण, तर 512 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 4,94,657 रुग्णांवर उपचार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 86 लाखांच्या पार गेला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाच्या आलेखात दिवसेंदिवस चढउतार होत आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशभरात आतापर्यंत सुमारे 86 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. तर आतापर्यंत सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे 80 लाखांपेक्षा जास्त जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 44 हजार 281 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 512 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 86 लाख 36 हजार 12 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 4 लाख 94 हजार 657 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 27 हजार 571 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 80 लाख 13 हजार 784 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies