Corona In India : देशात गेल्या 24 तासात 38,074 जणांना कोरोनाची लागण, तर 448 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासात 38,074 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाच्या आलेखात चढ-उतार होतांना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात 40 हजारांपेक्षा कमी जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशभरात सुमारे 85 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. तर सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 38 हजार 74 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 448 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 85 लाख 91 हजार 731 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 5 लाख 5 हजार 265 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 27 हजार 59 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 79 लाख 59 हजार 406 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies