Corona In India : देशात कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला 9 लाखांच्या घरात

गेल्या 24 तासात 28 हजार 498 नवे रुग्ण सापडले, तर 553 जणांचा मृत्यू


दिल्ली । देशात कोरोनाचा कहर हा सुरुच आहे. भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्याने 9 लाखांहून अधिकचा टप्पा ओलांडलेला आहे. गेल्या 24 तासात 28 हजार 498 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. तर एकाच दिवसात सुमारे 553 जणांचा बळी गेला आहे. त्यासह देशातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा हा 9 लाख 7 हजार 645 वर गेला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 3 लाख 11 हजार 565 हे सक्रिय रुग्ण आहेत. तर उपचारानंतर 5 लाख 71 हजार 430 रुग्ण हे निरोगी होऊन घरी परतले आहे. तर आतापर्यत कोरोनाने 23 हजार 727 जणांचा जीव घेतला आहे. जगातील इतर देशाचा जर विचार केला तर भारतात सर्वाधिक रुग्णांची संख्या वाढत आहे.

हेही वाचा : लॉकडाऊनच्या पाचव्या दिवशीही औरंगाबादेत 68 रुग्णांची वाढAM News Developed by Kalavati Technologies