Corona In India : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 63 लाखांच्या पार, आतापर्यंत 98 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या 24 तासात 86 हजार 821 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसेदिंवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. आजपासून देशात अनलॉक 5 ला सुरूवात झाली आहे. त्याअंतर्गत अनेक व्यवसाय सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 63 लाख जणांना ग्रासलं आहे. तर आतापर्यंत सुमारे 98 हजार जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक म्हणजे 52 लाख जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 86 हजार 821 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 1 हजार 181 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 63 लाख 12 हजार 585 एवढा झाला आहे. तर त्यापैकी सुमारे 98 हजार 678 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 52 लाख 73 हजार 202 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. देशात सध्या 9 लाख 40 हजार 705 जणांवर उपचार सुरू आहे.

दरम्यान, कोरोनाने जगभरातील सुमारे 200 पेक्षा जास्त देशात हाहाकार माजवला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 3 कोटी 35 लाखांच्या पार गेला आहे. तर 10 लाख 6 हजार जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 2 कोटी 32 लाख जण कोरोनातून मुक्त झाले आहे.AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: