Corona In India: देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 44 लाखांच्या पार; आतापर्यंत कोरोनामुळे 75 हजार जणांचा मृत्यु

देशात कोरोनाचा कहर सुरूच असून, गेल्या 24 तासात 95 हजार 735 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा करह सुरूच आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 44 लाख 65 हजार जणांना ग्रासलं आहे. तर सुमारे 75 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 34 लाख 71 जणांनी कोरोनावर मात केली आहे. केंद्रिय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात पुन्हा विक्रमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात, 95 हजार 735 जणांचा अहवास हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 1 हजार 172 जणांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 44 लाख 65 हजार 864 एवढा झाला आहे. तर सुमारे 75 हजार 62 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशात सध्या 9 लाख 19 हजार 18 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

दरम्यान, कोरोना या भयावह विषाणूनं भारतासह जगभरातील सुमारे 200 देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं जगभरात सुमारे 2 कोटी 77 लाख लोकांना ग्रासलं आहे. तर सुमारे 9 लाख जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब ही की, आतापर्यंत सुमारे 1 कोटी 86 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या जागतिक आकडेवारीचा जर आपण विचार केला तर, अमेरिका अव्वल क्रमाकांवर असून, त्यापाठोपाठ भारत दुसऱ्या क्रमाकांवर आहे.



AM News Developed by Kalavati Technologies