Corona In India : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 23 लाखांच्या पार; 24 तासांत पुन्हा एकदा विक्रमी रुग्णांची नोंद

देशात कोरोनाबाधितांचा आकडा 23 लाखांच्या पार गेला असून, देशात सध्या 6 लाख 43 हजार 948 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. देशात रोजच हजारोंच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. वाढती रुग्णसंख्या हा आता देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. भारतात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येने अमेरिका आणि ब्राझिलला सुद्धा मागे टाकले आहे. देशात गेल्या 14 दिवसांपासून रोजच 50 हजारांच्या वर कोरोनारुग्ण सापडत आहे. गेल्या 24 तासात देशात पुन्हा 60 हजार 963 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. देशात मृत्युचे प्रमाण ही वाढत चालले आहे. गेल्या 24 तासात 834 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून, आतापर्यंत कोरोनाने देशात 46 हजार 91 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात आतापर्यंत 23 लाख 29 हजार 638 जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी सुमारे 16 लाख 39 हजार 599 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या देशात 6 लाख 43 हजार 948 रुग्णांवर उपचार सुरू आहे. देशाचा रिकव्हरी रेट हा 70.37 टक्के इतका आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना दिलासादायक बाब म्हणजे देशात मृत्युचे प्रमाण 2 टक्क्यांपेक्षाही कमी झाले असून सध्या 1.99 टक्के मृत्युदराचे प्रमाण देशात आहे.AM News Developed by Kalavati Technologies