Corona In India : देशात गेल्या 24 तासात 55,722 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांचा आकडा 75 लाखांच्या पार

देशात गेल्या 24 तासात 55,722 जणांना कोरोनाची लागण झाली असून, कोरोनामुळे 579 जणांचा मृत्यू झाला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनारुग्ण सक्रिय होण्याच्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. रुग्ण बरे होण्याचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढला असून, हि एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. कोरोना या भयावह विषाणूने देशात सुमारे 75 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 55 हजार 722 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 579 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 75 लाख 50 हजार 273 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 7 लाख 72 हजार 55 रुग्णांवर देशातील विविध भागात उपचार सुरु आहे. उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 14 हजार 310 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 66 लाख 63 हजार 608 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies