Corona In India : देशात गेल्या 24 तासात 53,370 कोरोनाबाधितांची भर, तर 650 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 6,80,680 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 78 लाखांच्या पार गेला आहे

 नवी दिल्ली । देशात कोरोनाचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशभरात सुमारे 78 लाख जणांना ग्रासलं आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 70 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासात 53 हजार 370 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, 650 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 78 लाख 14 हजार 682 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 6 लाख 80 हजार 680 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 17 हजार 956 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक म्हणजे गेल्या 24 तासात 67 हजार 549 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून, आतापर्यंत सुमारे 70 लाख 16 हजार 46 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 


AM News Developed by Kalavati Technologies