Corona In India: देशात गेल्या 24 तासात 97,894 जणांना कोरोनाची लागण; 1132 जणांचा मृत्यू

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या 24 तासात 97,894 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर लगातार सुरूच आहे. गेल्या महिन्याभरापासून कोरोनाग्रस्तांचा रोजच विक्रमी रेकॉर्ड होत आहे. त्यामुळे देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. केंद्रिय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात सुमारे 97 हजार 894 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 1 हजार 132 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आंकड़ा हा 51 लाख 18 हजार 254 वर पोहोचला आहे. सध्या देशात 10 लाख 9 हजार 976 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाने आतापर्यंत सुमारे 83 हजार 198 जणांचा जीव घेतला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 40 लाख 25 हजार 80 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाने भारतासह जगभरातील सुमारे 180 देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं जगभरात सुमारे 2.98 कोटी लोकांना ग्रासलं आहे. तर 9.40 लाख जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.



AM News Developed by Kalavati Technologies