Corona In India: देशात गेल्या 24 तासात 97 हजार जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकडा 46 लाखांच्या पार

देशात कोरोनाचा कहर सुरूच असून, रोजच कोरोनाच्या रुग्णांची विक्रमी नोंद आहे त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या महिन्याभरापासून देशात रोजच विक्रमी रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे भारतीयांच्या चिंतेत आणखीणच भर पडली आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 46 लाख लोकांना ग्रासलं आहे. तर आतापर्यंत सुमारे 77 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 36 लाख जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

केंद्रिय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 पुन्हा विक्रमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात 97 हजार 570 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 1 हजार 201 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 46 लाख 59 हजार 84 एवढा झाला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 77 हजार 472 जणांना जीव घेतला आहे. दिलासादायक बाब ही की, आतापर्यंत सुमारे 36 लाख 24 हजार 196 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाने जगभरातील सुमारे 180 पेक्षा जास्त देशात हाहाकार माजवला असून, सुमारे 2 कोटी 81 लाख जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत सुमारे 9 लाख जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.



AM News Developed by Kalavati Technologies