Corona In India : देशात गेल्या 24 तासात 88,600 कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्येने ओलांडला 59 लाखांचा टप्पा

देशात सध्या 9,56,116 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत 94,503 जणांचा मृत्यू झाला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे. गेल्या 24 तासात देशात पुन्हा 88 हजार 600 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर 1 हजार 124 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांच्या बाबतीत भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे कोरोनारुग्ण बरे होण्याच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांकावर आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाग्रस्तांच्या एकूण आकडा 59 लाख 92 हजार 533 एवढा झाला असून, उपचारादरम्यान आतापर्यंत 94 हजार 503 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या 9 लाख 56 हजार 116 जणांवर देशातील विविध भागात उपचार सुरू आहे. तर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढला असून, आतापर्यंत सुमारे 49 लाख 41 हजार 628 जणांनी कोरोनावर मात केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies