Corona in India : देशातील गेल्या 24 तासात 85,362 कोरोनाबाधितांची भर, कोरोनाग्रस्तांचा आकडा 59 लाखांच्या पार

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून, गेल्या 24 तासात 85,362 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. वाढती रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं जगभरात सुमारे 59 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. तर आतापर्यंत सुमारे 93 हजार जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 48 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

केंद्रिय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 85 हजार 362 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 1089 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 59 लाख 3 हजार 933 एवढा झाला आहे. त्यामधून उपचारादरम्यान, 93 हजार 379 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 48 लाख 49 हजार 585 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या देशातील विविध भागात 9 लाख 60 हजार जणांवर उपचार सुरू आहे. 



AM News Developed by Kalavati Technologies