Corona In India : देशात गेल्या 24 तासात 15 हजार जणांना कोरोनाची लागण

देशात गेल्या 24 तासात 15,968 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 202 जणांचा मृत्यू झाला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोना लसीकरणास येत्या 16 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. नववर्षाला कोरोनाचा वेग मंदावला असून, कोरोना रुग्ण सक्रिय होण्याच्या प्रमाणात मोठी घट पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासात 15 हजार 968 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर 202 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 15,698 जणांना कोरोनाची लागण झाली असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 1 कोटी 4 लाख 95 हजार 147 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 2 लाख 14 हजार 507 जणांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत उपचारादरम्यान 1 लाख 51 हजार 529 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 1 कोटी 01 लाख 29 हजार 111 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies