Corona In India : देशात गेल्या 24 तासात 54044 जणांना कोरोनाची बाधा, तर 717 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 7,40,090 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 76 लाखांच्या पार गेला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 76 लाख जणांना ग्रासलं आहे. तर 1 लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाचा वेग जरी मंदावत असता तरी कोरोनासंबंधी नियमांचे पालन करने खुप महत्त्वाचे आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 54 हजार 44 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 717 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 76 लाख 51 हजार 108 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 7 लाख 40 हजार 90 जणांवर उपचार सुरू आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 15 हजार 914 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 67 लाख 95 हजार 103 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आह



AM News Developed by Kalavati Technologies