Corona In India : देशात गेल्या 24 तासात 50,129 जणांना कोरोनाची लागण, तर 578 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 6,68154 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 78 लाखांच्या पार गेला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोना वेग काही प्रमाणात मंदावला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 78 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 70 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 50 हजार 129 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 578 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 78 लाख 64 हजार 811 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 6 लाख 68 हजार 154 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 17 हजार 956 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 70 लाख 78 हजार 123 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies