Corona In India : देशात गेल्या 24 तासात 54,366 जणांना कोरोनाची लागण, तर 690 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 6,95,509 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 77 लाखांच्या पार गेला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा वेग काही प्रमाणात मंदावला असून, गेल्या 5 दिवसांपासून देशात 60 हजारांपेक्षा कमी कोरोनारुग्ण आढळत आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 77 लाख जणांना ग्रासलं आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 69 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 54 हजार 366 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 690 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 77 लाख 61 हजार 312 एवढा झाला आहे. देशात सध्या 6 लाख 95 हजार 509 जणांवर उपचार सुरु असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 17 हजार 306 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 69 लाख 48 हजार 497 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा रिकव्हरी दर हा 89.52 टक्के एवढा असून, मृत्यू दर हा 1.51 टक्के एवढा आहे.AM News Developed by Kalavati Technologies