अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर; शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण

जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे

अमरावती | जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये तब्बल 35 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच अमरावती शहरासह ग्रामीण भागामध्ये सुद्धा कोरोना प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी या तालुक्याच्या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून एकही कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नव्हता. मात्र प्रशासनाच्या धिम्या गतीने चाललेल्या कारभारामुळे आता शहरामध्ये दोन दिवसात तब्बल आठ कोरोना रुग्ण वाढले आहेत.

मात्र तरी स्थानिक प्रशासन यावर नियंत्रणासाठी अपयशी का ठरत आहे काय असा प्रश्न स्थानिक राजकीय नेत्यांनी उपस्थित केलेला आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचा शहरातील नियोजन बाबत कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे आज अंजनगाव शहरांमध्ये सात दिवस जनता कर्फ्यू पुकारण्यात आला असून सुद्धा सर्व नागरिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फिरत असल्याचे दिसून आले आहे. ज्याठिकाणी कंटेनमेंट जून लावण्यात आलेले आहे, त्या ठिकाणावर सुद्धा सर्व दुकाने उघडी असल्याचे पाहायला मिळत आहे.

नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे अंजनगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्याधिकारी यांची तातडीने बदली करावी यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रारी केलेले आहेत. प्रशासन कोरोना वर मात करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत असल्याची माहिती आमदार बळवंत वानखडे यांनी एएम शी बोलताना दिली .AM News Developed by Kalavati Technologies