जालन्यात कोरोनाचा विस्फोट; आज सकाळी 52 कोरोनाबाधितांची नोंद

जालन्यात कोरोना व्हायरसने मोठा हाहाकार माजवला आहे.

जालना | जालन्यात आज सकाळी 12 संशयित रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सकाळच्या दुसऱ्या सत्रात आणखी 40 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची रुग्ण संख्या ही आता 1043 वर जावून पोहोचली आहे. सकाळी दोन टप्प्यात नव्याने बाधीत आढळून आलेल्या 52 रुग्णांपैकी तब्बल 49 रुग्ण हे जालना शहरातील आहेत.

प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी प्रलंबित असलेल्या 201 नमुन्यांपैकी 12 संशयीत रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर काही वेळातच आणखी 40 बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जालना शहरातील काद्राबाद चौकातील 13,गांधीनगर 8,मंठा चौफुली जवळील चौधरी नगर 4,खवा मार्केट 2, पेन्शनपुरा, नेहरू रोड, संभाजी नगर जवळील कांबळे गल्ली, गणेश जिनिग, पाणिवेस, कॉलेज रोड, वाल्मिकी नगर,लककडकोट, अमित हॉटेल जवळ, चरवाईपुरा, तुळजाभवानी नगर,वाल्मिकी नगर, श्रीनगर, नूतन वसाहत, तट्टूपुरा, गोपिकीशन नगर, नया बाजार,विजिंगपुरा,नलगल्ली, पार्वती अपार्टमेंट, अकेली मस्जिद, पोस्ट ऑफिस गल्ली जाफराबाद, शाकुंतल नगर,मंठा आणि मेनरोड बदनापूर या भागातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

त्यामुळं जिल्ह्यातील एकूण बाधीत रूग्णांची संख्या आता 1043 इतकी झाली असून आतापर्यंत 596 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय.. तर 38 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies