जळगावात कोरोनाचा विस्फोट; दिवसभरात तब्बल 528 रुग्णांची नोंद, सहा जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी पाचशेच्या वर कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव | जिल्ह्यात कोरोना व्हायरसने मोठा हाहाकार घातला आहे. जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी कोरोना रुग्णसंख्येनं पाचशेचा आकडा पार केला असून एकूण रुग्णसंख्येचा 15 हजारांचा टप्पाही ओलांडला आहे. मंगळवारी जिल्ह्यात नव्याने 528 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 15 हजार 391 झाली आहे. सर्वाधिक 94 कोरोबाधित रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 6 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मंगळवारी दिवसभरात 375 बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच आहे. मंगळवारी नव्याने 528 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 94, जळगाव ग्रामीण 19, भुसावळ 8, अमळनेर 50, चोपडा 30, पाचोरा 17, भडगाव 48, धरणगाव 63, यावल 8, एरंडोल 51, जामनेर 50, रावेर 16, पारोळा 10, चाळीसगाव 45, मुक्ताईनगर 14, बोदवड 3 इतर जिल्ह्यातील 2 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 6 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात पाचोरा तालुक्यातील 2, जळगाव शहर, चोपडा, एरंडोल, व पारोळा तालुक्यात प्रत्येकी एका बाधीत रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies