औरंगाबाद शहरासह सिल्लोड तालुक्यातही कोरोनाचा कहर, 14 नवीन रुग्णांची वाढ

सिल्लोड तालुक्यात कोरोनाचे 14 नवे रुग्ण आढळले आहेत.

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोना व्हायरसने मोठा कहर केला आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सिल्लोड तालुक्यात कोरोनाचे तब्बल 14 नवे रुग्ण आढळून आले आहे. आरोग्य प्रशासनाला प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात जिल्ह्यात दुपारनंतर 66 रुग्णांचे (43 पुरूष, 23 महिला) अहवाल पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. यामध्ये 14 रुग्ण एकट्या सिल्लोड तालुक्यातील आहे.

दरम्यान जिल्ह्यात नव्याने आढळून आलेल्या 66 रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8 हजार 346 वर पोहचली आहे. यापैकी 4 हजार 834 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 351 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3161 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

*मनपा हद्दीतील रुग्ण : (18)*

जवाहर कॉलनी (3), हनुमान नगर (2), मातोश्री नगर (1), केसरसिंगपुरा (1), पेशवे नगर (1), कांचनवाडी (2), मुकुंद नगर (1), घाटी परिसर (2), आंबेडकर नगर (1), श्रीराम नगर (1), कासलीवाल तारांगण (1), श्री विक्रम सो., (2)

*ग्रामीण रुग्ण : (48)*

हतनूर, कन्नड (2), नागापूर, कन्नड (1), नागद, कन्नड (2), बोरमाळी, कन्नड (1), शास्त्री कॉलनी, सिल्लोड (1), छत्रपती नगर, सिल्लोड (1), मांडगाव, सिल्लोड (1), समता नगर, सिल्लोड (3), शिक्षक कॉलनी, सिल्लोड (1), हट्टी, सिल्लोड (1), गणेश कॉलनी, सिल्लोड (1), शिवाजी नगर, सिल्लोड (1), म्हसोबा गल्ली, सिल्लोड (1), टिळक नगर, सिल्लोड (1), जय भवानी नगर, सिल्लोड (1), बोरगाव वाडी, सिल्लोड (1), साकेगाव, वैजापूर (1), सफियाबादवाडी (1), मारवाड गल्ली, लासूरगाव (1), साजापूर, बजाज नगर (1), जिजामाता सो., बजाज नगर (3), वीर सावरकर कॉलनी, बजाज नगर (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (3), बजाज ऑटो क्वार्टर्स, बजाज नगर (2), द्वारकानगरी, जय भवानी चौक, बजाज नगर (1), आयोध्या नगरी, बजाज नगर (1), पियूष विहार, बजाज नगर (1), श्रम साफल्य सो., बजाज नगर (1), गणेश नगर, आनंदजनसागर, सिडको (3), बसवेश्वर चौक, बजाज नगर (1), कुरेशी मोहल्ला (7) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

*एका कोरोनाबाधिताचा मृत्यू*

घाटीत 11 जुलै रोजी बायजीपुऱ्यातील गल्ली क्रमांक पंधरामधील 60 वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.AM News Developed by Kalavati Technologies