कोरोनाचा विस्फोट! देशात गेल्या 24 तासात 57 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद, 764 जणांचा मृत्यू

देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 16 लाख 95 हजार 988 इतकी झाली आहे

नवी दिल्ली | देशात कोरोना महामारीचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. तसेच कोरोनापासून बळी पडलेल्या रुग्णांचा आकडाही वाढतच आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 57 हजार 117 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच कालावधीत 764 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 16 लाख 95 हजार 988 इतकी झाली आहे. यामध्ये आतापर्यंत 36 हजार 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आजवर 10 लाख 94 हजार 374 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सद्यस्थितीला देशात 5 लाख 65 हजार 103 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत देशात 5 लाख 66 हजार 840 इतकी करोना रुग्णांची संख्या होती. जुलै महिन्यात यात सर्वाधिक भर पडली आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात करोनाबाधितांच्या संख्येत 28८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies