कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे 38 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

एका 46 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे.

कल्याण | आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 38 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच एका 46 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. मृत झालेला रुग्ण हा कल्याण पूर्वेतील नेतीवली परिसरातील रहिवाशी आहे. दरम्यान आज आढळून आलेल्या 38 रुग्णांमुळं महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 980 इतकी झाली आहे. आतापर्यंत 334 रुग्ण या आजारातून पुर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या 618 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळं 28 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.AM News Developed by Kalavati Technologies