'काँग्रेस पक्ष म्हणजे बुडतं जहाज, गुजरात पोटनिवडणूकींचा निकाल हा तर काँग्रेससाठी ट्रेलर'

गुजरातमध्ये पार पडलेल्या पोटनिवडणूकींच्या सर्व आठ जागेवर भाजप विजयी झाली आहे

नवी दिल्ली । गुजरातमध्ये पार पडलेल्या पोटनिवडणूकीच्या सर्व जागेवर भाजपने विजय प्राप्त केला आहे. तर आगामी पंचायत निवडणुका आणि 2022 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप चांगला प्रदर्शन करेल. असा विश्वास गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्ष हे बुडते जहाज आहे. त्यांनी जनतेशी आपला संपर्क गमावला असून, सर्वच जागेवर भाजप विजयी झाली आहे. गुजरातमधील पोटनिवडणूकीत भाजपने विजयी झाली असून, आगामी काळातील निवडणुकीचा हा ट्रेलर आहे. अशी टिका गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काँग्रेसवर केली. जनतेला खोटे बोलून, खोटी अफवा पसरवून काँग्रेस निवडणुकीत फायदा घेण्याचा प्रयत्न करते. मात्र गुजरातच्या जनतेने काँग्रेसला चांगला धडा शिकवला आहे. असे म्हणत रुपाणी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.AM News Developed by Kalavati Technologies