लिंबू-नारळ-कुंकू-ओम्...राफेलच्या शस्त्रपूजनावर काँग्रेसची टीका, म्हणे- सरकार ड्रामा जास्त करते

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाचा स्वीकार केला.

नवी दिल्ली | भारताला पहिले लढाऊ विमान राफेल मिळाले आहे. राफेल येण्यापूर्वी एक मोठे राजकीय वादळ आले होते. आता राफेल मिळाल्यानंतरही पुन्हा एक नवी वादळ आले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये शस्त्र पूजा करत म्हणजेच राफेल विमानाची पूजा करत हे राफेल विमान स्वीकारले. यादरम्यान त्यांनी राफेलवर नारळ अर्पण केले. तसेच त्यावर ओम् रेखाटले आणि राफेलच्या चाकांखाली लिंबूही ठेवले. आता काँग्रेस नेता संदीप दीक्षितने या सर्व पूजेवर प्रश्नचिन्ह करत सरकावर निशाणा साधला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाचा स्वीकार केला. यावर काँग्रेस नेता संदीप दीक्षित यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, संरक्षण मंत्र्यांनी या विमानाचा स्वीकार का केला. हे फक्त नवीन लढाऊ विमान आहे जे आपल्याला मिळाले आहे. हे काम वायुसेना करु शकली असती.

राफेल विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवण्यात आला. यावर ते म्हणाले की, विजयादशमी आणि राफेल विमानाची जोडी मॅच करत नाही. संदीप दीक्षित म्हणाले की, दसरा एक सण आहे. या सणाला आपण सर्वच मानतो. पण तुम्ही याला एअरक्राफ्टची का जोडत आहात. या सरकारची एकच अडचणी आहे की, हे कामासोबत नाटक जास्त करतात. राफेलच्या पूजनाने फक्त काँग्रेसनेच टीका केली नाही. तर सोशल मीडियावरही अनेक मिम्स व्हायरल होत आहेत. जगाने असे पहिल्यांदा पाहिले असेल असे लोक म्हणत आहेत. तर काही लोक म्हणतात की, भारताने राफेललाही देसी बनवले आहे. तसेच राफेलच्या लिंबू-नारळवर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies