काँग्रेसचे आंदोलन 'बेगडी' राज्य सरकारनेच पेट्रोल डिझेलचे दर वाढवले, फडणवीसांचा घणाघात

राज्य सरकारनेच पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले त्यामुळे काँग्रेसचे हे आंदोलन बेगडी आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

अमरावती | पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात आज राज्यभरात काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन सुरू आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या या आंदोलनावर टीका केली आहे. कॉंग्रेस करत असलेलं आंदोलन हे 'बेगडी' असल्याची त्यांनी म्हंटलं आहे. पेट्रोल डिझेलची कॉस्ट सी थ्रू आहे, राज्याने पेट्रोल डिझेल टॅक्स लावले आहे त्यामुळे राज्य सरकारनेच पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले त्यामुळे काँग्रेसचे हे आंदोलन बेगडी आंदोलन आहे. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

अमरावती जिल्हा व विभागातील कोरोनाची काय स्थिती आहे यावर विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत फडणवीस बोलत होते. यात सुरुवातीला त्यांनी अमरावती सुप्पर स्पेशालिस्ट रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी संवाद साधला तर व्हीएमव्ही येथील मुलीच्या हॉस्टेल मध्ये तात्पुरत्या स्वरूपात क्वांरटाइन सेंटर मध्ये पाहणी करून आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात कॉंग्रेसने सुरु केलेल्या आंदोलनावर टीका केली आहे.

पडळकरांचे वक्तव्य चुकीचे - देवेंद्र फडणवीस

गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत आता गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर त्यांना राजकारण त्यांना करायचं आहे,आता यावर राजकारण होत राहील, पण गोपीचंद पडळकर यांनी असं वक्तव्य करायला नको पण त्याचं समर्थन आम्ही करत नाही, पडळकर यांना शरद पवार यांच्या विरुद्ध बोलन्याचा नैतिक अधिकार नाही असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कापूस खरेदी करण्यास सरकार अपयशी

कापूस खरेदी संदर्भात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे, सरकार पूर्णपणे फेलीवर ठरलं आहे,विहित मुदतीत राज्य सरकार कापुस खरेदी करू शकले नाही,अशी टीका राज्यसरकारवर देवेंद्र फडणवीस यांनी केली तर केंद्र सरकार कापूस खरेदी करायला तयार होतं, त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला 5700 कोटी रुपये दिलेत असेही त्यांनी सांगितले.

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा

तर बोगस बियाणे संदर्भात दोषीवर कारवाई झाली पाहिजे,पण आज शेतकऱ्यांच नुकसान कोण भरपाई करून देणार त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, बोगस बियाणे संदर्भात कायद्या प्रमाणे कारवाई करावी तर शेतकऱ्यांचे यात रीतसर अर्ज घ्यावे असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती कोविड सेंटर बद्दल नाराजी व्यक्त करत या उपाय योजनावर टीका केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies