कांद्याच्या दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; 'अशी' टीका बॅनरच्या माध्यमातून

संसद परिसरामध्ये काँग्रेसचे खासदार आंदोलन करत आहेत

नवी दिल्ली । कांद्याच्या वाढत्या दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. संसद परिसरामध्ये काँग्रेसचे खासदार आंदोलन करत आहेत. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. तिहार तुरुंगातून सुटका झाल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार पी. चिदंबरम संसदेमध्ये दाखल झाले आहेत. ते देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

सरकारने कांद्याचे भाव कमी करावेत आणि गरिबांचा छळ करणं थांबवावं, अशी मागणी करणारे बॅनर लावून घोषणाबाजी केली आणि कांद्याच्या टोपली घेऊन काँग्रेसच्या खासदारांनी निषेध केला. ‘कैसा है यह मोदी राज, महंगा राशन, महंगा प्याज’, ‘महंगाई की प्याज पर मार, चूप क्यूं है मोदी सरकार’ अशी टीका बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आंदोलनाला पी चिदंबरमही हजर राहिले होते. आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगवास झाल्यानंतर चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.AM News Developed by Kalavati Technologies