चिंता वाढली ! मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या 1399 वर, आज 217 नवीन रुग्ण

मुंबईत आतापर्यंत कोरोनाने 97 जणांचा बळी घेतला आहे

मुंबई | देशभरासह राज्यात कोरोनाचे थैमान काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दर तासाला वाढत आहे. आज मुंबईत कोरोनाचे 217 रुग्ण आढळून आले असून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सध्या मुंबईत आहे. आतापर्यंत मुंबईत 1399 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर या आजाराने 97 जणांचा बळी घेतला आहे.

कोरोना व्हायरस बाधित रुग्णांच्या संख्येत दर तासाला वाढ होत असल्याने मुंबईकरांची चिंता आणखीच वाढली आहे. राज्य सरकार तसेच प्रशासन कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहे. त्यानुसार आतापर्यंत 97 रुग्ण या आजारातून ठीक करण्यास प्रशासनाला यश आले असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies