दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट वाढला; राज्यात 10 लाख जणांनी केली कोरोनावर मात

राज्यात रुग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढला असून, आतापर्यंत 10 लाख 46 हजार 450 जणांनी कोरोनावर मात केली आहे

मुंबई । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, राज्यात कोरोनारुग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढला असून, राज्यात आतापर्यंत 10 लाख जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. आज दिवसभरात 23 हजार 644 रुग्णांना सुट्टी देण्यात आल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. 24 ऑगस्ट ते 26 सप्टेंबरच्या कालावधीत सुमारे पाच लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात रुग्ण सक्रिय होण्याचे प्रमाणसुद्धा कमी झाले आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट हा 76.94 टक्के झाला आहे. असे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, देशात सर्वाधिक कोरोनारुग्ण महाराष्ट्रात आढळले होते. कोरोना या भयावह विषाणूनं राज्यात सुमारे 13 लाख 21 हजार 176 जणांना ग्रासलं आहे. तर एकट्या महाराष्ट्रात 35 हजार 191 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 10 लाख 16 हजार 450 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 2 लाख 69 हजार 535 जणांवर उपचार सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies