दिलासादायक! औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला, आज जिल्ह्यात 181 कोरोनाबाधितांची वाढ

जिल्ह्यात सध्या 5 हजार 890 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 33 हजार 174 एवढा झाला आहे

औरंगाबाद । औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. जिल्ह्यात आज 181 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 33 हजार 174 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 5 हजार 890 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 925 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 26 हजार 359 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 90 आणि ग्रामीण भागात 58 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (71)

सिल्लोड (1), म्हस्के वस्त्री, सवंडगाव (3), पाचोड, पैठण (2), अन्य (1), नाटकरवाडी (1), गिरनेर तांडा (1), रामनगर (4),
औरंगाबाद (22), फुलंब्री (3), गंगापूर (9), कन्नड (6), खुलताबाद (4), सिल्लोड (2), वैजापूर (4), पैठण (2), सोयगाव (6)

मनपा (20)

पद्मपुरा (2), कोकणवाडी (2), नाथ प्रांगण, शिवाजी नगर (1), एन दहा सिडको (2), पुंडलिक नगर (1), रेणूका नगर (1), आयप्पा मंदिर परिसर, बीड बाय पास (1), नवीन म्हाडा कॉलनी (1),चाणक्यपुरी (2), मिलिट्री हॉस्पीटल परिसर (1), लेबर कॉलनी (1), आदित्य सो, (1),सुदर्शन नगर एन अकरा (1), गार्गी रेसीडन्सी, उस्मानपुरा (1),बजाजनगर (1), सत्यम नगर (1),

नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत सईदा कॉलनीतील 58 वर्षीय स्त्री, हस्ता कन्नड येथील 60 वर्षीय पुरूष, वैजापुरातील 65 वर्षीय स्त्री, अडगाव निपाणी येथील 68 वर्षीय पुरूष, देऊळगाव बाजार, सिल्लोड येथील 65 वर्षीय पुरूष, एन आठ सिडको येथील 83 वर्षीय स्त्री, कन्नडच्या बुद्ध नगरातील 52 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात उस्मानपुऱ्यातील 64 पुरूष, मनजित नगरातील 69 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: