दिलासादायक! देशात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 45,149 जणांना कोरोनाची लागण

देशात सध्या 6,53,717 जणांवर उपचार सुरु असून, कोरोनामुळे आतापर्यंत 1,19,14 जणांचा मृत्यू झाला आहे

नवी दिल्ली । जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाचा वेग मंदावला आहे. ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 79 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 45 हजार 149 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 480 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 79 लाख 9 हजार 960 एवढा झाला आहे. सध्या देशात 6 लाख 53 हजार 717 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 19 हजार 14 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 71 लाख 37 हजार 229 जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies