महाराष्ट्रात 30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

लॉकडाऊनमध्ये सूट देणं योग्य नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे.

मुंबई | राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा हाहाकार वाढत असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी राज्यात सुरू असलेल्या अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यामुळे कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सूट देणं योग्य नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे.

अशात राज्यातला लॉकडाऊन उठवण्यात येणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्य अनलॉक होत असताना अनेक दुकानं आणि व्यवसाय सुरू होत आहे. पण त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर पडून नका असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. यावेळी आपण शेतकऱ्यांच्या मागे खंबीर उभं राहणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं.

उद्धव ठाकरे यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे

राज्यात 30 तारखेपर्यंत हा लॉकडाउन आहे. 30 जूननंतर काय होणार आहे. लॉकडाउन हा शब्द आता बाजूला ठेवायचा आहे.

30 जूननंतर लॉकडाउन उठणार आहे का? असा सवाल विचारला जात आहे. त्याचे उत्तर त्यांनी नाही म्हणून दिले.

लॉकडाउनबद्दल काही शहरं विचारणा करत आहे. पण लॉकडाउन करण्याचा निर्णय हा तुमच्यावर सोपवणार आहे. त्यामुळे काही भागात जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर त्या ठिकाणी लॉकडाऊन लागू करावा लागणार आहे.

३० जूनला पंतप्रधान अन्नधान्य योजना संपत आहे. भगवे रेशन कार्ड आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, त्यांना धान्य वाटप केले जात आहे. ही मुदत 3 महिने वाढवण्यासाठी मुदत द्यावी अशी मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.

आपला शेतकरी अहोरात्र अफाट मेहनत करत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून बोगस बियाण्याच्या तक्रारी आल्या आहे. यांची गंभीर दखल घेतली आहे. जे बियाणे पेरले ते उगवलेच नाही. दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पण पैसे येणार कुठून?AM News Developed by Kalavati Technologies