मजुरांच्या समस्यांसाठी मुख्यमंत्री लवकरच घेणार बैठक, योजना जाहीर होण्याची शक्यता

ठोस पावले उचलण्याची शक्यता

वर्धा | देशात तसेच राज्यात लॉकडाऊनमुळे मजूर तसेच असंघटित मजुरांची अवस्था दयनीय झाली आहे. रोजगार नसल्याने समस्या उदभवणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच एक बैठक घेऊन यावर ठोस पाऊल उचलणार आहेत. काही योजना देखील जाहीर करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या महत्वपूर्ण बैठकीत यावर काही ठोस निर्णय समोर येण्याची शक्यता आहे. वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी वर्धा दौऱ्या दरम्यान ही माहिती दिली आहे.

अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात मजूर तसेच संघटित मजुरांची परिस्थिती बिकट झाली आहे. तब्बल 21 दिवस रोजगार नसल्याने परिस्थिती आणखी बिकट होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री निवासस्थानी वर्षावर बैठक घेऊन उपाययोजनेसाठी ठोस निर्णय घेणार आहेत. अशी माहिती मंत्री सुनील केदार यांनी दिली.

केदार आज वर्धा दौऱ्यावर होते. वर्ध्यात त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांची बैठक घेतली, बैठकीमध्ये उपाय योजनांचा आढावा घेऊन काही सूचनाही दिल्या, भाजीबाजारातील गर्दीवर नियंत्रणासाठी उपाय करण्याचे आदेश दिलेत. याशिवाय भाजीबाजार आणि शहरातील काही महत्वाच्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies