पुरंदरमध्ये चो-यांचे सत्र सुरूच, 17 तोळे सोन्याचे दागिने व रोख रकमेसह चोरट्यांचा पोबारा

सरपंच संभाजी कुंभार यांच्या घरात चोरी

पुणे | जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामधील गुळूंचे येथील घर फोडून, चोरट्यांनी 17 तोळे सोन्याचे दागिने, चांदी व रोख रक्कम घेऊन पोबारा केलाय. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

पुरंदर तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून चोरांनी उच्छाद मांडलाय. काही दिवसांपूर्वी जेजुरी पोलिसांनी चोरांच्या दोन टोळ्या जेरबंद केल्या होत्या. मात्र तरीही चोरीचे सत्र थांबायला तयार नाही.  मंगळवारी गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांच्या घरात रात्री चोरट्यांनी हात साफ केलाय. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चो-याचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी गावागावात ग्रामपंचायतींनी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याचे आणि ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies