चीनचा नेपाळच्या भूमीवर कब्‍जा; चीन विरोधात नेपाळी नागरिक उतरले रस्त्यावर

चीनने नेपाळच्या हुम्ला जिल्ह्यात कब्‍जा केला असून, त्याठिकाणी चीनी सैन्यांनी 9 इमारती सुद्धा बांधल्या आहेत

काठमांडू । एकीकडे जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. तर दुसरीकडे चीन आपल्या शेजारील देशांवर कब्‍जा करण्याच्या विचारात आहे. अशातच चीनने शेजारील देश नेपालच्या काही जिल्ह्यात कब्‍जा केला आहे. त्यामुळे नेपालच्या नागरिकांनी कोरोनाच्या काळातही चीन विरोधात आंदोलन पुकारत 'चायना गो बॅक' चा नारा दिला. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये चीनी दूतावासाच्या घरासमोर आज जोरदार आंदोलन करण्यात आले.

'आमची भूमी आम्हाला परत करा' 'स्टॉप बॉर्डर अतिक्रमण' चे फलक हातात घेऊन नागरिक आज रस्त्यावर उतरले होते. चीनी सैन्यांने नेपाळच्या हुम्ला जिल्ह्यापासून 2 किमी अंतरावर 9 इमारती तयार केल्या असून, त्याठिकाणी चीनी सैन्यांनी नेपाळी नागरिकांना येण्या-जाण्यास निर्बंध लादले आहे. दरम्यान, चीनने दावा केला आहे की, ज्या ठिकाणी इमारती तयार करण्यात आल्या त्या आपल्या भूपृष्ठावर आहे. तर नेपालचे म्हणणे आहे की, 11 नोव्हेंबर 2019 रोजी तयार करण्यात आलेल्या सीमेचं चीनने उल्लंघन केलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies