कर्नाटक पोटनिवडणूकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची बेळगावमध्ये जाहिरसभा

प्रचार सभेच्या आधी पावसाने सुरवात केली होती. भर पावसात भाजप कार्यकर्त्यांनी सभेसाठी हजेरी लावली होती

बेळगाव | कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक प्रचार सभा शेवटच्या टप्यात आली आहे. बेळगाव जिल्यातील कागवाड विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार श्रीमंत पाटील यांच्या प्रचारार्थ कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची जाहीर सभा ऐनापूर येथे पार पडली. प्रचार सभेच्या आधी पावसाने सुरवात केली होती. भर पावसात भाजप कार्यकर्त्यांनी सभेसाठी हजेरी लावली होती.

मुख्यमंत्री यांचे भाषण ऐकण्यासाठी नागरिकांनी हजारो संख्येने भर पावसात उपस्थित होते. मुख्यमंत्री येडियुरप्पा बोलताना म्हणाले कि, उमेदवार श्रीमंत पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. कारण श्रीमंत पाटील हे निवडून आल्यावर त्यांना मंत्रीपद देण्यात येणार आहे. श्रीमंत पाटील यांच्या बरोबर, अथणी विधानसभेचे उमेदवार महेश कुमठल्ली, व गोकाक विधानसभेचे उमेदवार रमेश जारकीहोळी यांच्यासह बेळगाव जिल्ल्याला तीन नवीन मंत्री मिळणार आहेत. आतापर्यत भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी कामे केली आहेत. महापूर आला त्यावेळी बेळगाव, विजापूर सह उत्तर कर्नाटकासाठी मोठी निधी उपलब्ध करून दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies