मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुन्हा अयोध्या वारी, सरकारला 100 दिवस पूर्ण होताच जाणार अयोध्येला

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून ही माहिती दिली

मुंबई ।  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला 100 दिवस पूर्ण होताच पुन्हा एकदा अयोध्येला जाणार आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत जाणार असल्याचे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.

ते म्हणाले, आधी घोषणा केल्या प्रमाणे उद्धव ठाकरे हे सर्व खासदारांना घेऊन अयोध्येत जाणार आहेत. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जातील. तसेच, श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील. प्रभू श्रीरामाची कृपेने महाविकास आघाडीचे सरकार जोरात कामास लागले आहे. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आधीही ठाकरे हे अयोध्येला गेले होते. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की मी पुन्हा अयोध्येला येईन. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी ते अयोध्येत जावून रामललाचं दर्शन घेणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies