नाणार विरोधातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मेट्रो कारशेडसाठी आरेतील 2646 झाडे तोडण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये चांगली जुंपली होती

मुंबई ।  नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे आदेश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला मोठया प्रमाणात विरोध होता. या प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवर तत्कालिन सरकारने गुन्हे दाखल केले होते. नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी हे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नाणार प्रकल्पातील आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. आज त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मेट्रो कारशेडसाठी आरेतील 2646 झाडे तोडण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये चांगली जुंपली होती. झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही आरेमध्ये कारशेड नको, अशी भूमिका घेत या प्रकल्पाविरोधात आवाज उठवला होता. याप्रकरणात आरेतील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies